Svadhar Yojana 2024-25 | स्वाधार योजना 2024-25 | Best Yojana

Svadhar Yojana 2024-25:नमस्कार वाचक मित्रांनो, मी महावार्ताहर परिवारात आपले स्वागत करतो. आज आपल्यासाठी घेऊन आलोय एका नव्या कोर्‍या योजनेबद्दलची माहिती. तर जाणून घेऊया त्या योजनेबद्दल. तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी त्यासोबत तुमचं जर होस्टेलमध्ये ऍडमिशन झालेलं नसेल, तर त्यासाठी भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सेवा सुविधा या स्वतः तुम्हाला उपलब्ध करून घेण्यासाठी ही योजना आहे, तर योजनेचे नाव आहे Svadhar Yojana 2024-25. तर ही स्वाधार योजना कशाप्रकारे राबवली जाते. त्यासाठीचा नवीन जीआर प्रसिद्ध झालेला आहे. मग या जीआर मध्ये किती पैसे भेटणार कुठल्या गोष्टीसाठी किती पैसे असणार आहेत कुठल्या जिल्ह्याला तालुक्याला किती पैसे असतील त्यासोबत अर्ज करण्यासाठी काय पात्रता असणार आहे. या योजनेच्या अंतर्गत काय फायदा दिला जातो आणि याचा अर्ज कशाप्रकारे केला जातो. याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या लेखामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Svadhar Yojana 2024-25
Svadhar Yojana 2024-25

योजनेबद्दल आढावा:

मित्रांनो, ही योजना प्रत्येकाला लागू नाही तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Svadhar Yojana 2024-25 ही जवळपास 2017 पासून ही योजना चालू आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा संबंधित जीआर आलेला आहे. सामाजिक व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग,  जिल्हा व तालुकास्तरावर मुला मुलींचे शिक्षणासाठी एकूण 443 शासकीय वसतिगृह सध्या कार्यरत आहेत. त्यासाठी मुलांसाठी वेगळे आहेत, मुलींसाठी वेगळी वस्तीगृह आहेत. त्यापैकी मुलांच्या वस्तीग्रहांमध्ये 20650 याप्रमाणे 43585 प्रवेशिक संख्या ही शासकीय वसतिगृहाचा लाभ घेत आहे. तर हा लाभ जे विद्यार्थी घेत असतात तर सदर वस्तीगृहामध्ये मात्र विविध अटी आणि शर्तीनुसार प्रवेश देण्यात येतो. प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास असेल भोजन असेल शैक्षणिक साहित्य असेल दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता असेल, अशा आवश्यक सेवा सुविधा दिले जातात. Svadhar Yojana 2024-25

राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली व्यवसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालयाची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जागेची मर्यादा लक्षात घेता प्रवेश देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश तपासून वंचित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यासाठी पुढील शैक्षणिक वाटचालीस मर्यादा येत आहेत. ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वस्तीग्रह सुरू करून देणे तेथे प्रवेश देण्यासाठी जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी मर्यादा लक्षात घेता, सबब मागासवर्गीय शासकीय वस्तीग्रह न मिळाल्याने अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील इयत्ता 11 वी 12 वी व त्या नंतरच्या व्यवसायिक बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून 2017 च्या शासन निर्णयाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांनी याचा लाभ देखील घेतलेला असेल परंतु आता नव्याने हा जीआर आलेला आहे. याच्यामध्ये संपूर्ण फेरविचार करणं कालानुरूप धोरण राबवण्यासाठी नवीन धोरण आखण याचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना साठी एकसमान सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने हा जीआर जो आहे या ठिकाणी समिती गठीत स्थापन करून देण्यात आलेला आहे.Svadhar Yojana 2024-25

योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम:

अ. क्र. खर्चाची बाब मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम इतर महसुल विभागीय शहरातील व उर्वरीत क वर्ग महानगरपालीका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम इतर जिल्हयाच्या ठिकाणी तसेच महानगर पालिकेच्या हद्दीपासून ५ कि.मी. परिसरात असलेली महाविदयालये/ शैक्षणिक संस्था या ठिकाणी अनुज्ञेय रक्कम तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम
भोजन भत्ता रु.३२,०००/- रू.२८,०००/- रू.२५,०००/- रु.२३,०००/-
निवास भत्ता रू.२०,०००/- रू.१५,०००/- रू.१२,०००/- रु.१०,०००/-
निर्वाह भत्ता रू.८,०००/- रु.८,०००/- रू.६,०००/- रू.५,०००/-
प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम (दोन सत्र, १० महिन्यासाठी) रु.६०,०००/- रु.५१,०००/- रु.४३,०००/- रु.३८,०००/-

 

 

 

 

 

 

योजनेचे निकष:

अ. मुलभूत पात्रता:

१. विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असणे गरजेचे आहे.

२. विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.

३. शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.

४. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असणे गरजेचे आहे.

५. विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

६. Svadhar Yojana 2024-25 योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रीयेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. तथापि, सदर अट ही ज्या महानगर / शहरांमध्ये वसतीगृहांची संख्या एका पेक्षा अधिक असल्यास त्या महानगर/शहरांमधील सर्व वसतीगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेवून वसतीगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील, त्यानंतर प्रवेश न मिळालेल्या उर्वरीत पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

७. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्यांने अर्जामध्ये स्वाधार योजनेचा पर्याय नमूद करणे गरजेचे आहे.

८. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेडयूल्ड बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न करणे गरजेचे आहे.

९. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

१०. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या- ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा त्या-त्या प्रमाणे लागू राहील.

११. साधारणतः दरवर्षी जून महिन्यात वसतीगृह प्रवेश प्रक्रीया सुरू होते, त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतीगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत. यासाठी एक ऑनलाईन पोर्टल बनविण्याचे काम सूरू आहे. ते कार्यान्वित नसल्यास गृहपाल/सहाय्यक आयुक्त यांना ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची मुभा राहील. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यास स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त ३० नोव्हेंबर पर्यंत राहील. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लागल्याने गहाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया उशीरा होईल, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशंनंतर एका महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल.

१२. विद्यार्थ्यास शासकीय वसतीगृहात मिळालेला प्रवेश रद्द करून म्हणजेच वसतीगृहातील जागा रिक्त करून स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही.

१३. वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमतः वसतीगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल व तद्नंतर गुणानुक्रमेच स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

१४. सदर योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील तृतीयपंथी (Transgender) पात्र असतील.

ब) शैक्षणिक निकष:

१. सदर विद्यार्थी इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.

२. विद्यार्थी स्थानिक नसावा (ज्या महाविदयालय/शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविदयालय / शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका/नगर पालिका/ ग्रामपंचायत/कटक मंडळे यांच्या हद्दीत आहेत त्या महानगर पालिका/नगर पालिका/ ग्रामपंचायत/ कटक मंडळे / तालुक्यातील रहीवासी नसावा.)

३. महानगर पालिकेच्या हद्दीपासुन ०५ कि. मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीसुध्दा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.

४. स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे, त्याच्या केवळ लगतच्या मागील वर्षात किमान ५० टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन/CGPA असणे अनिवार्य आहे. त्यापूर्वीच्या इतर परीक्षेच्या गुणांचा विचार करण्यात येवू नये.

५. एका शाखेची पदगी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाम अनुज्ञेय राहणार नाही.

६. इयत्ता १२ वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा. (संबंधित अभ्यासक्रम शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी अनुज्ञेय असावा.)

७. शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेला विद्यार्थी स्वाधार योजनेस पात्र ठरतो. शासकीय वसतीगृह प्रवेश नियमावलीनुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देता येत नाही. तथापि, विद्यार्थ्यांने स्वाधार योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात शिकत असताना अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामधील पात्रता तपासून केवळ स्वाधार योजनेचा पुढील काळाकरीता लाभ देता येईल..

८. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (पदवी/पदव्युत्तर) प्रवेश घेतला असल्यास स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. (उदा. अभियांत्रिकेच्या पदवी बी.ई. नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यास स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.)

९. बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदव्युत्तरला लाभ अनुज्ञेय राहील. (उदा. बी.ए. नंतर एल.एल.बी., बी.ए.नंतर बी. एड, बी. कॉम. नंतर एम.बी.ए.)

१०. Svadhar Yojana 2024-25 योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यांना ३% आरक्षण असेल, अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रगाणपत्र अनिवार्य आहे. दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४०% इतकी राहील, त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

११. स्वाधार योजनेतर्गत गहिलांसाठी ३०% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय राहील.

१२. स्वाधार योजनेंतर्गत निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभासाठी पात्र होईल. मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्याक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

१३. या योजनेसाठी खासबाग सवलत लागू असणार नाही.

Svadhar Yojana 2024-25

अनुदान वितरण :-

१. Svadhar Yojana 2024-25योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे, त्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे त्या विदयार्थ्यांनी अर्ज करावा. त्यानुसार सबंधित राहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे विदयार्थ्यांची निवड करतील आणि पात्र लाभार्थ्यांस जवळचे गागासवर्गीय मुला/मुलींचे वसतीगृहांचे गृहपाल यांचेशी संलग्न (Attach) करतील.

२. विद्यार्थ्यांचा प्रवेश ज्या वसतीगृहाशी सलंग्न करण्यात येईल, त्या वसतीगृहाच्या गृहपालाने सादर केलेल्या महाविद्यालयीन उपस्थितीच्या आधारे संबंधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे प्रत्येक सहामाहीस (सहा महिने) अनुज्ञेय रक्कम संबधित विद्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बैंक खात्यामध्ये जमा करतील.

३. शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्याने संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेतर्गत अनुज्ञेय रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.

४. Svadhar Yojana 2024-25 योजनेंतर्गत लाभारा पात्र असलेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजावट करून, उर्वरीत निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, निवास भत्ता, याची रक्कम अदा करण्यात येईल.

५. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ % आवश्यक राहील, याबाबत विद्यार्थ्यास संबंधित संस्थेचे प्रत्येक तिमाहीस उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल. तसेच विद्यार्थ्यांची प्रगती, शिस्त व वर्तणुक समाधानकारक असावी.

६. विद्यार्थ्यांने अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील.

७. सदर योजनेचा लाभ केवळ पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठीच लागू राहील, अर्धवेळ अभ्यासक्रम, दूरस्थ व बहिस्थ अभ्यासक्रम, नोकरीसह करण्यात येणारा Executive Course यासाठी सद योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

८. Svadhar Yojana 2024-25योजनेकरिता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणुन घोषीत करण्यात येत आहे.

Svadhar Yojana 2024-25

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः-

१. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे पतिज्ञापत्र (नोटरी).

२. विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.

३. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

४. भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा.

५. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.

Svadhar Yojana 2024-25

click-here
                            हेही वाचा: PM Svamitva Yojana 2024-25

 

Svadhar Yojana 2024-25

महत्वाची सूचना:

  • मित्रानो, आम्ही आपल्याला देत असेलेली माहिती ही विविध स्रोताद्वारे मिळवत असतो. त्यामुळे आपण कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबधित वेबसाईटला किंवा माहिती पत्रकातून काही गोष्टी पडताळूनच निर्णय घ्यावा.
  • योजनेची पात्रतेसाठी प्रत्येक सरकारी योजनेसाठी सरकार काही पात्रता आणि निकष ठरवत असते. त्यामुळे संबंधित योजनेचा जीआर वाचने ही आपली जबाबदारी आहे.
  • नियम आणि अटी: प्रत्येक योजनेचे नियम व अटी काळजीपूर्वक वाचून मगच योग्य तो निर्णय घ्यावा.अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला नक्की Join व्हा….
  • योजनेचा अर्ज आपण संबधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा संबधित कार्यलयात ह्या योजनासंबधी अधिक माहिती मिळवू शकता.
  • धन्यवाद.

PM Svamitva Yojana 2024-25 | प्रधानमंत्री स्वामित्व योजना 2024-25 | आता करा आपली जमीन सुरक्षित | Best Yojana

अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या Whatsup Group ला नक्की Join व्हा….

WhatsApp Group Join Now