PM Svamitva Yojana 2024-25 Details:
PM Svamitva Yojana 2024:नमस्कार वाचक मित्रांनो, मी महावार्ताहर परिवारात आपले स्वागत करतो. आज आपल्यासाठी घेऊन आलोय एका नव्या कोर्या योजनेबद्दलची माहिती. तर जाणून घेऊया त्या योजनेबद्दल. तर योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री स्वामित्व योजना 2024-25. तर ही स्वामित्व योजना कशाप्रकारे राबवली जाते. या योजनेच्या अंतर्गत काय फायदा दिला जातो आणि याचा अर्ज कशाप्रकारे केला जातो. याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या लेखामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो, ग्रामीण भागातील नागरिकांना स्वामित्व योजनेतून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 27 डिसेंबर पासून राज्यात प्रधानमंत्री स्वामित्व योजना 2024-25 राबवण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे या योजनेचे उद्घाटन 27 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच काल केले. 25 डिसेंबर रोजी नागपूर येथील पत्रकार परिषदेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्रात जे ग्रामीण भागामध्ये राहणारे बांधव आहेत, त्यांच्यात जमिनीमुळे होणारे वादविवाद, मालकी हक्कावरून होणारे वादविवाद त्याचप्रमाणे त्यांच्याकडे प्रॉपर्टि कार्ड नसल्यामुळे कळत नकळत कोणीही कब्जा, लुबाड किवा फसवणूक केली जाते. म्हणून वडीलोपार्जित शेकडो वर्षापूर्वीच्या जमिनी किवा घर डिजिटल पद्धतीने त्याच कार्ड नागरिकांकडे, गावठांनामध्ये, शेतकर्याकडे असलं पाहिजे. याकरिता माननीय प्रधानमंत्री यांच्या विचारानुसार या आधुनिक युगात आधुनिक कागदपत्रे आपल्या मालकीच असलं पाहिजे. महाराष्ट्रात जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. 30515 गाव या योजनेमध्ये डिजीटलाइज होणार आहेत.“PM Svamitva Yojana 2024-25
योजना कश्याप्रकारे राबविली जाईल:
- मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी ही योजना काय आहे. प्रॉपर्टि कार्ड मिळणार म्हणजे नेमकं काय होणार तर याची माहिती आपण या ब्लॉग मधून घेणार आहोत. त्याआधी थोडं आपण मागे जाऊया.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2020 साली 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनाच औचित्य साधून PM Svamitva Yojana 2024-25 योजनेची घोषणा केली. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना ड्रोन आणि जीआयएस या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहेत म्हणजे काय तर तुमच्या स्थावर मालमत्तेचे जसं की घर असेल, जमीन असेल यांचे नकाशे गाव पातळीवरती उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
- बऱ्याचदा तर भावकी गावकी जागेवरून टोकाचे वाद करत असतात. त्यामुळे गावठाणातील घराच्या जागेबद्दल स्पष्टता आणन बांधकाम परवाने देणे यासारख्या बाबी यापुढे प्रॉपर्टी कार्ड वरून केल्या जाणार आहेत. एवढेच नाही, तर गृह कर्ज विविध सरकारी योजना मालमत्ता करापासून ते पुढील पिढीकडे स्थावर मालमत्तेच हस्तांतर करण्यापर्यंत यासारख्या सर्वच योजना आणि कामांसाठी प्रॉपर्टी कार्ड आवश्यक असणार आहे.
- आता जे काही तुम्ही वाचलय त्याची सगळी माहिती तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी कार्ड वर मिळणार आहेत.
- त्यासाठी महसूल आणि ग्रामविकास खात्याकडून तुम्हाला हे प्रॉपर्टी कार्ड या स्वामीत्व योजनेतून देण्यात येणार आहे. तर अशी ही योजना आहे. आज दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले आहे.
- यानंतर राज्यातील 30515 गावांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
PM Svamitva Yojana 2024-25
योजनेचे फायदे:
- देशभरात 3.17 लाख गावांचं ड्रोनच्या मदतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलय तर आत्तापर्यंत 1.49 लाख गावांमध्ये 2.19 कोटी होऊन अधिक प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आलेत.
- परिणामी गावठाणातील जमिनीच्या मालकी हक्कावरून जे वाद डिजिटल पद्धतीने मॅपिंग झाल्यानंतर कमी होतील. तसेच एकाच कार्डवर तुमची सगळी माहिती उपलब्ध असल्याने कोणतेही कर्ज असेल ते घेण्यासाठी वेगवेगळी कागदपत्र तुम्हाला देण्याची गरज राहणार नाही.
- तर महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचा दर्जा सुद्धा वाढेल. कारण प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याने महिलांना मालमत्तेचा कायदेशीर हक्क आणि मालकी सुद्धा मिळणार आहे.
- तर एकूणच गावठाण जमिनीवरून निर्माण झालेली वाद यातून मिटतील आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, असा या योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकारची ही एक महत्त्वाची योजना मानली जाते. कारण पंतप्रधान मोदींनी कोविड 19 च्या दरम्यान या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील मालमत्ता कार्डचं वाटप सुरू केलं होतं. म्हणजे कोविड-19 ची साथ असताना सुद्धा या योजनेवरील केंद्र सरकारचा फोकस कमी झालेला नव्हता.
- विशेषत: आदिवाशी भागात नागरिकांकडे पिढ्यानं पिढ्या जमिनीच्या मालकीची कागदपत्र नसतात. त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना कायमस्वरूपी मालमत्ता कार्ड मिळवण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
- तसेच, जमीन मोजणीच्या वेळी ग्रामसेवक, महसूल विभागातील अधिकारी, जमिनीचा मालक, पोलिस अधिकारी, संबंधित मालमत्तेचा शेजारी यांची उपस्थिती असणं आवश्यक असतं. ड्रोनच्या सहाय्याने मात्र मोजणी झाल्यानंतर उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्यात येतात. त्यामुळे या योजना अत्यंत पारदर्श कता आहे असंही बावनकुळे म्हणालेत.
PM Svamitva Yojana 2024-25 Video:
PM Svamitva Yojana 2024-25
ज्या जमीणींवर आधीच वाद चालू आहेत त्यांचं काय ?
आता तुमच्यातले बरेच जण असेही म्हणतील की ज्या जमिनीवरून किंवा घरावरून आधीच वाद आहे किंवा प्रकरण न्यायप्रविष्ट अशा प्रकरणात काय भूमिका घेतली जाणार आहे, तर यावर महसूल मंत्री बावनकुळे काय म्हणाले ते बघा, बावनकुळे म्हणतात की, “जे डीस्प्युट आहे त्याबद्दलचा योग्य निर्णय जिल्हाधिकारी सिओ तिथली व्यवस्था करेल, पण 99% प्रॉपर्टि अशा आहेत ज्या या मध्ये नाहीत. त्यामुळे 99% प्रॉपर्टि किमान त्याच स्वामित्व त्यांना मिळेल हे महत्वाच आहे.” अशा या स्वामीत्व योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. योजनेची सुरुवात आजपासून राज्यात करण्यात येणार आहे.
PM Svamitva Yojana 2024-25
महत्वाची सूचना:
- मित्रानो, आम्ही आपल्याला देत असेलेली माहिती ही विविध स्रोताद्वारे मिळवत असतो. त्यामुळे आपण कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबधित वेबसाईटला किंवा माहिती पत्रकातून काही गोष्टी पडताळूनच निर्णय घ्यावा.
- योजनेची पात्रतेसाठी प्रत्येक सरकारी योजनेसाठी सरकार काही पात्रता आणि निकष ठरवत असते. त्यामुळे संबंधित योजनेचा जीआर वाचने ही आपली जबाबदारी आहे.
- नियम आणि अटी: प्रत्येक योजनेचे नियम व अटी काळजीपूर्वक वाचून मगच योग्य तो निर्णय घ्यावा.अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला नक्की Join व्हा….
- योजनेचा अर्ज आपण संबधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा संबधित कार्यलयात ह्या योजनासंबधी अधिक माहिती मिळवू शकता.
- धन्यवाद.