Ladki Bahin Yojana 2024-25 नवीन निकष | या लाडक्या बहिणी अपात्र | Essential & Best Information

Ladki Bahin Yojana: नमस्कार वाचक मित्रांनो, मी महावार्ताहर परिवारात आपले स्वागत करतो. आज आपल्यासाठी घेऊन आलोय लाडकी बहीण योजनेबद्दल लावण्यात आलेले नवीन निकष तर जाणून घेऊया त्या निकषांबद्दल. मित्रांनो, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील काही स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत आणि या स्टेटमेंटच्या आधारावर बऱ्याच बातम्या वाहिन्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्जदारांच्या अर्जाची छाननी होणार, त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी अपात्र होणार अशा प्रकारच्या बातम्या दाखवल्या  जात आहेत आणि नेमकं त्यांच्या माध्यमातून कोणते स्टेटमेंट आणि कोणते नवीन निकष या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून अपात्र करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत. याच्या संदर्भातील जीआर आणि  माहितीच्या माध्यमातून सविस्तर समजून घे-ण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana
                    Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेसाठी लावण्यात आलेले निकष: 

निकष 1:

मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी जीआर निर्गमित करण्यात आला. या जीआर मध्ये वेळोवेळी काही ना काही तरी बदल करण्यात आले. याच्यासाठीच्या समित्या गठीत करण्यात आल्या याच्यामध्ये जी काही कागदपत्र मागण्यात आलेली होती. ती कागदपत्र अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध होऊ शकत नाहीत. म्हणून याच्यामध्ये कागदपत्र देण्यासंदर्भात काही शिथिलता देण्यात आल्या होत्या आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती बरेच सारे संभ्रम निर्माण झाले आणि आता ही योजना राबवण्यासाठीच्या गाईडलाईन्स देण्यात आलेल्या होत्या. त्या गाईडलाईन्स, त्या निकषाला सुद्धा आता नवीन निकष असं समजल जात आहे. मित्रांनो, यामध्ये आपण बघाल तर, सर्वात पहिली आणि महत्त्वाचे अट होती, ती म्हणजे एका महिला लाभार्थ्याला एकच अर्ज दाखल करायचा होता. याच्यामध्ये काही बऱ्याचश्या महिला लाभार्थ्यांचे माहेरचे नाव, सासरचे नाव, आधारकार्डवर असलेले नाव अशा नावातील बदलांमध्ये अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. आता आधारकार्डवर असलेले नाव आणि सासरचे नाव याच्यामध्ये काही बदल असेल. तर त्याच नावाने एकाच ठिकाणी एकाच बँकेचे अकाउंट देऊन अर्ज करणे अपेक्षित होतं. पण असेही काही अर्ज दाखल झाले आहेत की ज्यामध्ये माहेरच्या नावाने पण आणि सासरच्या नावाने पण अर्ज दाखल करण्यात आला. ते लाभार्थी म्हणून पात्र नाहीत. परंतु असे जे काही अर्ज आहेत जे अपात्रतेच्या कक्षेमध्ये येत आहे. ते अर्ज अपात्र केले जाणार आहे.Ladki Bahin Yojana

निकष 2:

दूसरा मुद्दा म्हणजे बऱ्याच ठिकाणी महिला लाभार्थ्यांकडून डीबीटीशी संलग्न नसलेले बँक खाते देण्यात आलेले होते. याच्यामुळे आता डीबीटीशी संलग्न असलेलं महिला लाभार्थ्यांचा आधार संलग्न असलेला बँक खात्याला असलेलं नाव आणि महिला लाभार्थ्याचा असलेले नाव याच्यामध्ये सांधर्म्य देखील तपासले जात आहे आणि हे सांधर्म्य असलेलेच अर्ज पात्र होणार आहे. अशा प्रकारे यापूर्वीसुद्धा जीआर मध्ये तरतूद करण्यात आले होते म्हणजे अर्थाअर्थी ज्या महिला लाभार्थ्याचा हा अर्ज आहे ज्या महिला लाभार्थ्याची डीबीटी केली जाणार आहे. त्याच महिला लाभार्थ्यांचा खात असावं जेणेकरून त्याच महिला लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे वितरण होणार आहे. अर्थात, कोणी पतिच्या नावावर किवा कोणी चुकीच्या नावावरती किंवा इतर कोणी नावावरती दुसऱ्या अकाउंट मध्ये जर पैसे घेत असतील तर त्याच्यामध्ये आता अडथळा लागणार आहे.Ladki Bahin Yojana

निकष 3:

मित्रांनो, याच्यानंतर तिसरी महत्त्वाची अशी अट होती ती म्हणजे अडीच लाखाच्या उत्पन्नाची, त्याच्यासाठी रेशन कार्ड असेल, जर रेशन कार्ड असतील तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही असे सांगून अर्ज भरून घेण्यात आले होते. याच्यामध्ये समजा एखाद्या महिला लाभार्थ्याकडे जर उत्पन्न त्यांचे जास्त असेल. त्या महिला नोकरीवरती असतील, घरी मोठी चारचाकी गाडी असेल आणि अशा प्रकारच्या जर काही तक्रारी प्रशासनाला दाखल करण्यात आल्या. या तक्रारी प्राप्त झाल्या तरच छाननी करण्यात येणाऱ्या अर्जामधला प्रकार आहे. एखाद्या महिला लाभार्थ्याकडे मोठी चारचाकी गाडी आहे. त्यांच्या घरी सुबलता आहे म्हणजे त्या आर्थिक स्थैर्य असलेल्या आहेत. अशा पद्धतीने जर कोणी या अडीच लाखापेक्षा किंवा जास्त उत्पन्न असलेल्या महिला लाभार्थी याच्यामध्ये लाभ घेत असतील आणि त्याच्याविरुद्ध काही तक्रार आली तर त्या महिला लाभार्थ्यांना देखील याच्यामध्ये अपात्र केलं जाणार आहे.Ladki Bahin Yojana

निकष 4:

याच्यानंतर आंतरराज्य विवाहाच्या बाबतीत एक महत्त्वाची अट देण्यात आली होती. जर एखादी महिला परराज्यातून या राज्यात आलेली असेल तर तिच्या पतीची कागदपत्र मात्र सादर करावी लागणार आहेत. आता बऱ्याचदा केस मध्ये काय झाले की माहेरच्या नावानं अर्ज केलेला आहे. माहेरच्याच नावाचं बँक अकाउंट आहे. परंतु महिलेचं लग्न होऊन महिला परराज्यात राहते, अशा बऱ्याच सार्‍या केस निदर्शनास आलेल्या आहेत किंवा परराज्यातून विवाह करून या राज्यामध्ये आलेल्या परंतु त्यांच्या पतीची सुद्धा या ठिकाणी आधीवासाची कागदपत्र नसलेल्या शहरी भागामध्ये बऱ्याच सार्‍या महिला लाभार्थी आहेत आणि कुणीही या चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ नये, खऱ्या ज्या काही महिला लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मदत व्हावी म्हणून हे निकष आहेत. यांच्यामध्ये कुठलाही नवीन निकष नाही.Ladki Bahin Yojana

निष्कर्ष: 

जीआर नुसार जे निकष आहेत, तेच निकष आणि त्याच निकषांच्या अंतर्गत याच्यामध्ये जर कोणी अपात्र असेल तर त्यांना अपात्र केलं जाणार आहे. अशा प्रकारचे ते स्टेटमेंट देण्यात आले. परंतु निकषानुसार अर्जाची छाननी वगैरे सांगितल्यानंतर जे काही आधीचं याच्यामध्ये लाभार्थी आहेत. त्यांच्यामध्ये साहजिकच भीतीच वातावरण निर्माण होतं आणि त्याचा मोठा अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यामध्ये मदत होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये नवीन कुठलेही निकष नाही. जे काही खरोखर महिला लाभार्थीत आहे, ज्या खरोखर गरीब आहेत, ज्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाची गरज आहे. अशा लाभार्थ्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही. तर अशा प्रकारे जे काही जुने लाभार्थी आहेत. ते  जुने असेच राहणार आहे. फक्त यामध्ये काही चुकीचा प्रकार दिसून आला, तर मात्र त्या महिला लाभार्थी अपात्र होऊ शकतात. लवकरच याच्या अंतर्गत बजेटमध्ये याच्या संदर्भातील काही तरतूद केली जाऊन पुढे योजनेच्या अंतर्गत 2100 रुपये मानधन सुद्धा केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. परंतु तूर्तास तरी या योजनेच्या अंतर्गत असलेल्या अटी शर्थी निकषाच्या पात्रतेनुसार पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना 1500 रुपयांचं मानधन वितरित केल जात आहे. आता याच्यामध्ये बर्‍याचश्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यावरती हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे. पूर्वीसुद्धा आधार संलग्न महिला लाभार्थ्यांचे डीबीटी चालू नव्हतं त्यांनाही काही वितरण करण्यात येतय आणि आणखी 1400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्याला सुद्धा वित्त विभागांन मंजुरी दिलेली आहे. तो निधी सुद्धा वितरित झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे जे काही हफ्ते असतील ते वितरित करण्यासाठी शासनाकडे पैसे उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, अश्या प्रकारची ही माहिती किवा अपडेट होत जे तुम्हाला नक्की उपयोगी पडेल….

Ladki Bahin Yojana

click-here
                            हेही वाचा: Cabinet Decision Pik Vima Yojana

 

Cabinet Decision Pik Vima Yojana | केंद्राकडून शेतकर्‍यांसाठी देण्यात आलेले नवीन वर्षाचे 2 मोठे गिफ्ट | Best Decision

Cabinet Decision Pik Vima Yojana

महत्वाची सूचना:

  • मित्रानो, आम्ही आपल्याला देत असेलेली माहिती ही विविध स्रोताद्वारे मिळवत असतो. त्यामुळे आपण कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबधित वेबसाईटला किंवा माहिती पत्रकातून काही गोष्टी पडताळूनच निर्णय घ्यावा.
  • योजनेची पात्रतेसाठी प्रत्येक सरकारी योजनेसाठी सरकार काही पात्रता आणि निकष ठरवत असते. त्यामुळे संबंधित योजनेचा जीआर वाचने ही आपली जबाबदारी आहे.
  • नियम आणि अटी: प्रत्येक योजनेचे नियम व अटी काळजीपूर्वक वाचून मगच योग्य तो निर्णय घ्यावा.अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला नक्की Join व्हा….
  • योजनेचा अर्ज आपण संबधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा संबधित कार्यलयात ह्या योजनासंबधी अधिक माहिती मिळवू शकता.
  • धन्यवाद.

Ladki Bahin Yojana

अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या Whatsup Group ला नक्की Join व्हा….

WhatsApp Group Join Now