Buldhana Takkal Virus | बुलढाणा टक्कल व्हायरस | 3 दिवसात टक्कल | Best & Essential Information

Buldhana Takkal Virus | बुलढाणा टक्कल व्हायरस | तीन दिवसात टक्कल

मित्रांनो तुम्ही कधी टक्कल व्हायरस चं नाव ऐकलय, नाही ना, पण हो बुलढाण्यात टक्कल पडण्याचा आजार सुरू झालाय. केसात कोंडा होणे, केस गळणे, टक्कल पडणं आपल्यापैकी अनेकांना केसांशी संबंधित अशा वेगवेगळ्या समस्या असतात या मागची प्रत्येकाची कारणे ही वेगवेगळी असतात, काहींच्या बाबतीत केस गळती ही अनुवंशिक असते, तर काहींचे केस टेन्शनमुळे गळतात, त्यामुळे केस गळती किंवा टक्कल पडणं हा तसा कॉमन विषय आहे. तो काही कोरोना किंवा एचएमपीव्ही सारखा घातक व्हायरस नाही. बुलढाण्यात सध्या केस गळतीचा विचित्र असा टक्कल वायरस आल्याची चर्चा होतेय. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अनेकांना अचानक टक्कल पडायला सुरुवात झाली आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना टक्कल पडतंय, यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे संपूर्ण बुलढाण्यात आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जातेय. बुलढाण्यातल्या या गावांमध्ये टक्कल पडण्याचा हा गंभीर रोग आल्याच स्थानिकांच मत आहे. या मागची वेगवेगळी कारण ही सांगितली जात आहेत. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय बुलढाण्यात सगळ्यांना एकाच वेळी टक्कल का पडते यावर तज्ञांचं मत काय त्याची लक्षणे काय या सगळ्यांची माहिती आपण आज जाणून घेऊयात.Buldhana Takkal Virus

Buldhana Takkal Virus
                                    Buldhana Takkal Virus

आजाराची सुरुवात:

बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील बोंडगावात दहा-बारा दिवसांपूर्वी या गावातल्या विनायक इलामे यांच्या पत्नी आणि दोन मुलींच्या डोक्यात अचानक खाज यायला सुरुवात झाली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या हातात केसांचे पुंजकेंच्या पुंजके यायला लागले. त्यामुळे घाबरलेल्या इलामे यांनी जिल्ह्यातल्या खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यात धाव घेतली आणि मुलींची तपासणी केल्यानंतर शॅम्पू मुळे इन्फेकशन झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यांना औषध आणि केसांना लावण्यासाठी काही लोशन दिली. पण त्याचा कोणताही फरक पडत नव्हता. यांच्या शेजाऱ्यांनाही सारखाच त्रास सुरू झाला. त्यानंतर गावातल्या इतरही काही लोकांना अचानक टक्कल पडत असल्याचा समोर आलं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शॅम्पू मुळे हा त्रास होत असला, तरी गावातील सगळेच लोक एकाच प्रकारचा शाम्पू वापरणं शक्य नाही. महत्त्वाच म्हणजे ज्यांनी आयुष्यात कधीही केसांना शाम्पू किंवा साबणही लावलेला नाही, अशा लोकांनाही टक्कल पडत असल्याचं समोर यायला लागलं. हळूहळू बोंडगावाच्या शेजारी असलेल्या कालवड आणि कठोरा या गावांमध्ये लोकांना असंच टक्कल पडायला सुरुवात झाल्याचं आढळून आलं. मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपासून शेगाव तालुक्यासह संपूर्ण बुलढाण्यात भीतीच वातावरण निर्माण झाल. सध्या सरकारी आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत बोंडगावात 16 कालवड मध्ये 13 तर कठोरात 7 जणांना टक्कल पडल्याचं सांगण्यात येतेय. Buldhana Takkal Virus

नेमकं हे टक्कल कसं पडतं त्याची कोणती लक्षणे आहेत

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अचानक डोक्यात खाज येते. दुसऱ्या दिवशी मुळापासून केस हातात यायला लागतात. तर तिसर्‍या दिवशी सगळे केस जाऊन पूर्णपणे टक्कल पडते. बोटांच्या चिमटीत केस धरल्यावर केसांचे पुंजकेंच्या पुंजके हातात येतात. पण हे नक्की का होत, या मागची वेगवेगळी कारण आता सांगितले जात आहेत. यामध्ये शॅम्पू किंवा साबणाच्या ऍलर्जीची शक्यता कमी असली तरी दूषित पाण्यामुळे असं घडत असावं, असं काही तज्ञांचे मत आहे. या संदर्भात गावचे सरपंच रामेश्वर थारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड आणि कठोरा पट्टा खारपाण पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नैसर्गिक रित्या इथलं पाणी खारं आहे. काही वर्षांपूर्वी गावातले लोक हेच पाणी पीत होते. तेव्हा काही गावकऱ्यांना किडनीचे आजार झाले होते. त्यामुळे गेल्या आठ-दहा वर्षांपासून आम्ही पिण्याचा पाणी टँकरने विकत घेतो. तर आंघोळ आणि इतर वापरासाठी तिथलच बोरवेलच पाणी वापरलं जातं. पण आजवर कधीही या पाण्यामुळे कोणालाही अशा प्रकारचा त्रास झालेला नाही  त्यामुळे आत्ताच असं होण्यामागची नेमकी कारण काय असेल त्याचा शोध घेणे गरजेचे असल्याचं थारकर यांनी सांगितलं. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. दरम्यान आरोग्य विभागासह याकडे दुर्लक्ष होत असून हे प्रकरण गांभीर्यांन हाताळल जात नसल्याची टिका ही थारकर यांनी केली आहे, असा त्रास होणाऱ्या पेशंटची संख्या जास्त आहे. महिला आणि तरुण-तरुणी हा आजार लपवत असल्याची शंका ही उपस्थित केली आहे. सगळ्यात जास्त महिलांना या आजाराची लागण झाल्याचाही दावा स्थानिकांकडून केला जातोय. दरम्यान या आजाराची माहिती मिळताच आरोग्य विभागाची पथक बोंडगाव, कालवड, कठोरा आणि हिंगणा या गावांमध्ये दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. या पथकांकडून गावातल्या घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलं जातंय. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून माहिती दिली आहे. गावातील लोकांचा सर्वेक्षण केलं असता, हे लोक आंघोळ आणि इतर कामांसाठी बोरवेलच पाणी वापरतात. हे पाणी दूषित झाल्याची शक्यता असल्यामुळे गावात केस गळतींच्या रुग्णांची संख्या वाढत चालण्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आलाय. दरम्यान गावकरी वापरत असलेल्या पाण्याचे सॅम्पल्स गोळा करून ते शेगावला तपासणीसाठी पाठवण्यात आले, तसेच या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जोपर्यंत पाण्याच्या सॅम्पलचा तपासणी अहवाल समोर येत नाही, तोपर्यंत टक्कल पडण्यामागचा नेमका कारण समजण कठीण असल्याचही सांगितलं जातंय. रुग्णांच्या रक्ताचे सॅम्पल घेऊन त्यांची तपासणी करण्याची मागणी ही गावातील स्थानिकांकडून करण्यात आली आहे. जेणेकरून हा वायरस नक्की आहे काय, तो संसर्गजन्य आहे का, त्यान माणसांच्या जीवाला काही धोका आहे का हे शोधायची गरज असल्याचं सरपंच थारकर  यांचं मत आहे. पण अचानक टक्कल पडण्याच्या या आजारामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केल जात आहे. गावाच्या आजूबाजूला पाणी दूषित होण्यासाठी कोणतेही उद्योगधंदेही सुरू नाही. त्यामुळे तिथून पाण्यात केमिकल मिसळण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे या आजारा मागचे नक्की कारण कोणत आहे हे पाहणं आता महत्त्वाच असणार आहे. Buldhana Takkal Virus

click-here
हेही वाचा: HMPV Virus Cases in India 2025 | एचएमपीव्ही चीनमध्ये  माजवतोय धुमाकूळ, भारतातही आढळले रुग्ण

 

Buldhana Takkal Virus

HMPV Virus Cases in India 2025 | एचएमपीव्ही चीनमध्ये माजवतोय धुमाकूळ, भारतातही आढळले रुग्ण | Best & Essential Information

Buldhana Takkal Virus

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या Whatsup Group ला नक्की Join व्हा….

WhatsApp Group Join Now